भंडारा जिल्हातील लाखनी शहरातील प्रसिद्ध चित्रकार कु.भैरवी निर्वाण यांनी यंदाच्या नवरात्रोत्सवानिमित्त देवी दुर्गेची नऊ प्रकारचे रूपाचे आंब्याच्या पानावर आकर्षक चित्र रेखाटले असून तीने त्याच तोरण बनवून माँ दुर्गे च्या चरणी अर्पण केले असून नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. प्रत्येक सण-उत्सवाला आपल्या चित्रकलेतून कलाकृतीतून वेगळा ठसा उमटवणाऱ्या भैरवीने यापूर्वीही अनेक चित्रा च्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधले आहे. रंगांची देखणी उधळण, सूक्ष्म रेषांकन व कलात्मक मांडणी ही त्यांची खासियत असून सर्व स्तरातून त्यांच्या कलाकृतीचे कौतुक होत आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 12