भंडाऱ्यातील रावणवाडी परिसरात आढळला दुर्मिळ चाबूक विंचू…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचा सरीसर्प संशोधक विवेक बावनकुळे हा भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी जंगल परिसरात फिरायला गेला असता संध्याकाळ च्या सुमारास ऐक वेगळा प्रकारचा विंचू रस्ता ओलांडताना त्याला दिसला. त्याने जवळून बघतील असता नवीन प्रकारची चाबकासारखी बारीक शेपूट असलेली विंचू प्रजाती आढळली असून याविषयी काही उल्लेख सापडेल म्हणून बराच शोध घेतला पण याचा कुठेही उल्लेख विदर्भ, मराठवाड्यात मिळाला नाही. या घटनेची माहिती ग्रीन फ्रेंड नेचर चे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांना दिली असता मुंबई बी.एन. एच. एस मध्ये कार्यरत असलेले ‘इसाक किहिमकर’ सर यांना विचारले असता हा व्हीप स्कोर्पिओन हा विंचू काही वर्षा पूर्वी पश्चिम घाटात आढळलयाची माहिती आहे. मात्र चाबूक विंचू पश्चिम महाराष्ट्र मध्ये आढळल्याच यापूर्वी उल्लेख माहिती आहे. दुर्मिळ विंचू पश्चिम महाराष्ट्र वगळता बाकीच्या महाराष्ट्रच्या भागात तसेच प्रथमच हा दुर्मिळ विंचू भंडारा जिल्हात आढळल्याबदल सरीसृप संशोधकात आंनद व्यक्त केला जात आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका, मुलींचे मोफत शिक्षण लवकरात लवकर अमलात आणा आणि देवाभाऊला सद्बुद्धी येऊ दे रे बाप्पा असे फलक लावून ओबीसी क्रांती मोर्चाने गणपती बाप्पाकडे घातले साकडे….