इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्याजवळ फक्त पाच टक्के शेती राहिली 95 टक्के शेती ही उद्योगपत्यांच्या घशात घातली. ही अशीच व्यवस्था आहे, आम्ही समृद्धी म्हणतो ना! तो फक्त मोठ्या खाजगी कारखानदारासाठी केलेली व्यवस्था आहे. मुंबई टू नागपुर नागपुर टू मुंबई हे जे काही हब आहेत या माध्यमातून हा माल अतिशय सोयीच्या आणि चांगल्या पद्धतीने जलद गतीने अधिक चांगल्या पद्धतीने गेल्या पाहिजे. आमचा त्याबद्दल दुमत नाही पण आमचा पांदण रस्ता झाला नाही आमचा माल शेतीच्या बाहेर निघत नाही त्यासाठी तुमची काय व्यवस्था आहे.? आज त्या शक्तीपिठाला पर्यायी रस्ता आहे तरी घेतले जात आहे. माझं म्हणणं आहे तुम्ही टोल बसवले ना मग ज्याची जमीन जाते त्याला मिळू द्या ना ते पैसे….

Author: vbn newsnetwork
Post Views: 25