भंडारा जिल्हातील लाखनी तहसील येथील कार्यालयातील संजय निराधार विभागातील कर्मचारी गणवीर यांच्या कार्यपद्धतीने तालुक्यातील वृद्ध, दिव्यांग, निराधार महिला यांना कमालीचा मनस्ताप सहन सहन कराव लागत असून अपमानाचाही सामना करावा लागत असून लाखनी नगर पंचायत चे नरसेवक विपुल कांबळे हे काही वृद्ध लोकांचे समस्या करिता गेले असता त्यांना काही वेळ वाट बघावी लागली असता त्यांनी त्या लिपिक कर्मचारी याला विचारलं असता त्यांच्यावर अपशब्द चा वापर केला असून त्यांना संध्याकाळी 7 नंतर बघून घेण्याची धमकी दिली. मात्र नगरसेवक यांनी समजुदार पणाने घेत तहसीलदार यांना त्याची तक्रार केली. पण अद्याप ही त्या कर्मचारी वर कुठली ही कारवाई झाली नसल्याने नगरसेवक संतापले असून आमच्या सारख्या पदाधिकारी सोबत असा व्यवहार होत असेल तर सामान्य नागरिक सोबत कसा व्यवहार होत असेल या वरून स्पष्ट होत आहे. त्यावर तहसीलदार धनंजय देशमुख यांना माध्यमांनी विचारलं असता संपूर्ण घटनेची माहिती घेऊन दोषी आढळल्यास कारवाई करू असे सांगितले.
