पलाडी ग्रामपंचायत ने केले पहाडा येवढे कार्य!….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

स्मार्ट ( रिचार्ज ,प्रीपेड ,डिजिटल ,) मीटर ला दिला जोरदार करंट !…

भंडारा:- संपूर्ण लोक आपल्या समस्या सांगण्यासाठी संसद भवन, विधानभवनात जाऊ शकत नाही, त्यासाठी लोकांनी आपल्या समस्या चे निराकरण करण्यासाठी आणि समस्या मांडण्यासाठी आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी वोट च्या माध्यमातून प्रतिनिधी नेमले, मात्र हे प्रतिनिधी लोकांच्या समस्यांचे निराकरण न करता त्यांना समस्या मध्ये दिवसेंदिवस गुंतवून ठेवत आहेत, त्याचाच एक उदाहरण म्हणजे, स्मार्ट (रिचार्ज , डिजिटल ) मीटर होय.

जनतेनी स्मार्ट मीटर ची मागणी केली नाही तरी जनतेच्या पगारी नोकरांनी स्मार्ट मीटर जनतेला विस्वासात न घेता, आर्थिक बाबीचा विचार न करता, जबरदस्तिने स्मार्ट मीटर लावण्याचे काम युद्धपातळीवर चोरून लुकून सुरु केले आहे, जनता ज्या जीवनावश्यक बाबीची मागणी करत आहे , ते जनतेला देणे लोकप्रतिनिधीला जमत नाही , उलट ते त्याचा विरोध करतात , विधानसभा व लोकसभा यात जनविरोधी कायदे पास करतात , मात्र लोकप्रतिनिधी ला हे माहिती नाही की , लोकसभा राज्यसभा, विधानसभा ,विधानपरिषद यांच्या पेक्षा ग्रामसभा जास्त पावरफुल आहे.

कायद्याचा अभ्यास न करणाऱ्या लोकप्रतिनिधी कडून ही अपेक्षा करणे म्हणजे स्वताचा विस्वासघात करणे आहे , विस्वासघात होऊ नये म्हणून स्मार्ट (रिचार्ज ,डिजिटल ) मीटर विरोधात ग्रामसभेत ठराव घ्यावा यासाठी निवेदन देण्यात आले.
स्मार्ट मीटर च्या संभाव्य ,भविष्यकालीन , आर्थिक धोक्यातून जनतेला वाचण्यासाठी ग्राहक तक्रार मंच , मानवाधिकार आयोग , जनहित याचिका , सर्वोच्च न्यायालय यांचा सहारा घ्यावा लागतो. त्याची सुरुवात त्यांनी दिघोरी (आमगाव) ग्रामपंचायत पासून केली असून त्याचे लोण आता सर्व देशभरात पोहचले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून पलाडी गावात सुद्धा लोकांनी स्मार्ट मीटर विरोधात पुराव्यानिशी निवेदन ग्रामपंचायत ला दिले आणि सर्वानुमते स्मार्ट मीटर विरोधात ठराव घेण्यात आला , स्मार्ट मीटर लावणे बंधनकारक नाही , असे न्यायालयाने सांगितले आहे , न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरोधात जो कोणी जाईल त्याच्या विरोधात जनआंदोलन करणार आहे याला पाठिंबा म्हणून गावातील लोकांनी सुध्दा बळजबरी करणारा विरोधात वारंट निघावा असे मत व्यक्त केले आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें