भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आज मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन होणार असून गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. अशात मात्र महिलावर्ग काल स्थापित झालेल्या गौराईचे विसर्जनासाठी लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळपासून महिलावर्गांनी उत्साहात पूजा-अर्चा करून गौराईचे विसर्जन करण्यासाठी घराबाहेर पाऊल टाकले. पारंपरिक गीतांच्या स्वरात व जल्लोषात महिलांनी गौराईला निरोप दिला. अनेक ठिकाणी सामूहिक विसर्जनही करताना महिला पाहायला मिळाल्या. जिल्ह्यात सर्वत्र गौराई विसर्जन व गणेशोत्सवाची आतुरता भाविकांमध्ये असल्याने श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Author: vbn newsnetwork
Post Views: 216









