भंडारा जिल्ह्यातील चिकन-मटनच्या दुकानांवर आज सकाळपासूनच प्रचंड गर्दी दिसून येत आहे. श्रावण मासात अनेक मांसाहारी नागरिकांनी मांसाहार टाळला होता. नुकताच श्रावण सोमवाराचा संपला आणि शनिवारी पोळ्याचा पाडवा साजरा झाला. त्यानंतर आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने मांसाहार करण्यासाठी चिकन-मटन दुकानांचा रस्ता धरला. सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले असून बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांच्या मते, आजच्या विक्रीत नेहमीपेक्षा दुप्पटीने वाढ झाली आहे.….
Author: vbn newsnetwork
Post Views: 89









