सन 1966 पासून भंडारा जिल्ह्यात अंशकालीन महिला परिचारिका सेवा बजावत आहेत. परंतु एवढ्या वर्षांच्या सेवेनंतरही त्यांना समाधानकारक मानधन मिळालेले नाही. यामुळे परिचारिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. किमान वेतन द्यावे तसेच ‘अंशकालीन’ ही संज्ञा बदलून नियमित परिचारिका म्हणून मान्यता द्यावी, या मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर महिला परिचारिकांनी आंदोलन छेडले. घोषणाबाजी करून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. “मानधन नव्हे तर किमान वेतन द्या” या घोषवाक्याने जिल्हा परिषद परिसर दुमदुमला होता. शासनाने तातडीने योग्य तो निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी परिचारिकांनी केली आहे.
Author: vbn newsnetwork
Post Views: 150









