सम्राट प्रसेनजीत समाज विकास संस्था नागपूर तर्फे जिजाऊ सावित्री मुक्ता विचार मंच आणि स्टुडन्ट एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जगप्रसिद्ध साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन अनिल खडसे उपायुक्त आयकर विभाग यांनी केले तर अध्यक्षस्थानी संस्थेचे वरिष्ठ सदस्य डी के सरनाईक होते. दोन सत्रांमध्ये आयोजित या कार्यक्रमांमध्ये पहिल्या सत्रामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन तर दुसऱ्या सत्रामध्ये सामाजिक प्रबोधन करण्यात आले. उद्घाटक अनिल खडसे यांनी त्यांचा एका अति गरीब कुटुंबातील मुलगा ते आय आर एस हा प्रवास उलगडून सांगताना आपला ध्येयाच्या पाठलाग करण्याकरिता सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता सांगितली.सहआयुक्त प्रदीप बोरकर यांनी विद्यार्थ्यांना न्यूनगंड न बाळगता उच्च ध्येय ठेवून त्याचा पाठलाग करण्याचे आवाहन केले. आर्टी चे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल भालेराव यांनी आर्टिद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला तसेच वरिष्ठ समाज कल्याण अधिकारी पराग वासनिक यांनी समाज कल्याण विभागातील विविध विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सह आयुक्त आर डी आत्राम यांनी समाजातील प्रतिष्ठित लोकांनी समाजाचं ऋण फेडण्यासाठी पे बॅक टू सोसायटी ही भावना अंगीकरण्याचे आवाहन केले.समाजाची प्रगती करायची असेल तर आपल्या महापुरुषांची माहिती होणं आवश्यक आहे, त्यासाठी पुस्तकांच्या माध्यमातून महापुरुष रुजवण्याची संकल्पना संविधान जागर चे स्वप्निल फुसे यांनी मांडली. स्पर्धेच्या युगामध्ये आव्हान पेलण्यासाठी सामाजिक ऐक्याची गरज, समोरील समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापक धर्मवीर चव्हाण यांनी विश्लेषण केले.
याप्रसंगी अर्थ फाउंडेशनचे डॉक्टर कुलभूषण मोरे आणि समाजसेवक राजेश खंडारे यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच सेवानिवृत्ती निमित्त सुभाष वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. शाहीर धम्मा खडसे आणि सृष्टी खडसे यांनी आपल्या शाहिरी आणि पोवाडे सादर करून महापुरुषांची महती सादर केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गोपाल वानखेडे, सूत्रसंचालन अमित वाघमारे तर आभार प्रदर्शन प्रकाश तायवाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या सफल आयोजनासाठी जेठुजीजी वाघमारे, वामनराव अडागळे कमलाकर वानखेडे, संजय तायवाडे, मनीषकुमार अडागळे, राजेश वानखेडे, संतोष नृपनारायण, उल्हास वानखेडे,प्रभानंद बावणे, सुभाष खंडाळ, राजेश गायकवाड, रवींद्र बावणे, सुजित सनेश्वर, डॉ. विजय खडसे, शंकर कावळे, प्रवीण सनेश्वर, कृणाल खंडारे, दीपिका अडागळे ,सुरेखा तायवाडे, संध्या अडागळे, प्रतिभा खंडारे,वर्षा वानखेडे, वैशाली अडागळे, शारदा वानखेडे, सुरेखा कांबळे, माधुरी गायकवाड,प्रिया बावणे,स्वाती वाघमारे सौम्या अडागळे, सांची बावणे, स्वप्निल तायवाडे ,हर्षल तायवाडे यांचे सहकार्य लाभले.
