एक साप दुसऱ्या सापाला गिळत असेल म्हटल्यावर व्हिडिओ पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथील शामराव निर्वाण यांचे घरी साप असल्याची माहिती ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब लाखनीचे सर्पमित्र सलाम बेग यांना मिळाली. त्याने घटनास्थळी धाव घेतल्यावर असे लक्षात आले की विषारी पट्टेरी मण्यार साप दुसऱ्या एका मोठ्या आकाराच्या पाणदिवड सापाला गिळत आहे. हा व्हिडिओ मोबाईल मध्ये चित्रित झाला असून मण्यार सापाने दुसऱ्या सापाला गिळल्यानंतर मण्यार सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 34