जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठीची निवडणूक रविवारीला अत्यंत शांततेत व उत्साही वातावरणात पार पडली. सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती आणि विशेष म्हणजे,यामध्ये 100 टक्के मतदान नोंदवले गेले.यामुळे आता 46 उमेदवारांचे भवितव्य लवकरच जाहीर होणाऱ्या निकालावर अवलंबून आहे. 21 जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात होते.मतदानाच्या दिवशी एकूण 1062 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदारांसाठी मतदान केंद्रापर्यंत ये-जा करण्याची सोय करण्यात आली होती.सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उत्साही वातावरणात मतदान पार पडले.जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था,शेतकरी संस्था आणि सेवा सोसायट्यांमधील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. सकाळपासूनच मतदार केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली.मतदान प्रक्रिया शांततेत आणि अत्यंत शिस्तबद्धरित्या पार पडल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. मतदान केंद्रांवर योग्य सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती आणि कुठलाही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.
