भंडारा नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा घेरावमुख्याधिकार्‍यांना गढूळ पाणी भेट….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा : नगरपालिकेमध्ये प्रशासक राज असल्यामुळे भंडारा शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये अनेक समस्या उद्भवल्या असून रहदारीचे रस्ते तुटल्या फुठल्या परिस्थितीत असल्याने रस्त्यावर साधे चालता देखील येत नसल्याचे चित्र सर्वत्र सुपरिचित आहेत. याच परिस्थितीचे जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्या दालनात जाऊन घेराव घातला तसेच प्रश्नांचे भडीमार केले. याप्रसंगी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे, शहराध्यक्ष मधुकर चौधरी, जिल्हा सचिव अजय मेश्राम यांच्या नेतृत्वामध्ये मुख्याधिकारी यांना घेराव करून सामान्य नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यात याव्यात याकरिता निवेदन देण्यात आले. चरण वाघमारे यांनी मुख्याधिकारी यांना त्यांचे कर्तव्याची जाणीव करीत भंडारा शहरात गढूळ पाणीपुरवठा होण्याचे कारण विचारुन याकरीता आपल्या कर्मचार्‍यांना पाठीशी घालतात का? असा देखील त्यांनी सवाल उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरात मोठया प्रमाणात नागरीकांच्या समस्या उद्द्भवल्या असुन नगरपालीकेच्या वतीने नागरीकांच्या समस्यांकडे पाठ फिरवले जात आहेत यामुळे परिसरात मोठया प्रमाणात समस्याचे डोंगर उभे झाले आहेत. आपण मुख्याधिकारी असल्या नंतरही अनेक प्रभागामध्ये दुजाभाव दिसून येत आहे. याचेकडे आपण जातीने विचारमंथन करणे गरजेचे आहे. अनेक प्रभागामध्ये आजही जाणे-येण्याचे साधन दिसून येत नाहीत. आपल्याकडून प्रभागाच्या भेटी देखील घेतल्या जात नाही. नगर परिषदे मध्ये प्रशासक राज असल्याने सामान्य जनता आपल्या पर्यंत पोहचू शकत नाही. आपण प्रत्येक भागात तक्रार निवारण शिबीरे घेण्यात यावीत जेणे करुन सामान्य नागरीकांना आपल्यास भेटण्याकरीता त्रास होणार नाही, असा देखील समज देण्यात आला.

वेदन देतांना माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे, शहराध्यक्ष मधुकर चौधरी, जिल्हा सचिव अजय मेश्राम, चंद्रशेखर भिवगडे, चेतराम काकुसे, शुक्राचार्य डोंगरे, यशवंत भोयर, मधुकर भोपे, राजू थोटे, इंद्रजीत येणे, देवदास मारबते, गीते ठोंबरे, राजा खान, संजय गायधने, हरिश्चंद्र धकाते, राकेश रामकुवर, शरीफ खान, मोसिन खान, रोहित श्यामकुवर, साहिल शेख, हमीद शेख, हर्षल बडोले, सहज पठाण, आवेश पटोले, सर्जत पठाण, जावेद शेख, युवती जिल्हाध्यक्ष नीलिमा रामटेके, शहराध्यक्ष शाहीणा खान, लता बावनकुळे, नीलिमा मेश्राम, योगिता सूर्यवंशी, रूपाली साखरकर, जयश्री राऊत, लता बावनकुळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें