नागपूर येथील ओबीसी मुलींच्या वस्तीगृहात सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण ऐरणीवर तर भंडाऱ्यात ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने महिला वसतिगृहाची पाहणी….
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील मुलींच्या वस्तीगृहात बाहेरील दोन व्यक्ती शिरून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.राज्यातील महायुतीचे सरकार राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या गृह जिल्ह्यात ही घटना घडलेली आहे.आमच्या डीएनए ओबीसीचा आहे ओबीसी साठी आम्ही काहीही स्मार्ट सिटी करू शकतो असे सरकार म्हणत असून ओबीसींच्या मुलींच्या वस्तीगृहात सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावू शकत नाही.गेटला लॉक लावू शकत नाही तर गेटवर चौकीदार ठेवू शकत नाही.अश्या नागपूर सारख्या शहरात जर अशी सुरक्षेची व्यवस्था असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात वस्तीगृहांची काय स्थिती असेल तर हे विचार न केलेले बरे..याच पार्श्वभूमीवर आज भंडाऱ्यातील महिला वस्तीगृहाला ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी यांनी भेट देत पाहणी केली असून काही त्रुटी दिसून आले आहे.ह्या समस्या सरकार तात्काळ सोडवावे अशी मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येशील असा इशारा सुद्धा देण्यात आलं आहे.
