शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्याकरिता आज जिल्हाभरात प्रहार पक्षाच्यावतीने चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं होतं..या आंदोलनाला जिल्हाभरातील शेतकरी संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला असून भंडारा नागपूर महामार्गावरील खरबी येथे प्रहार पक्षाच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामुळे अर्धा तास रास्ता रोखण्यात आले यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा सुद्धा दिल्या..शेतकऱ्यांनी यावेळी सात बारा कोरा, दिव्यांगांच्या भत्त्यात वाढ या प्रमुख मागण्यासाठी हा रस्ता रोको केल आहे.मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा आंदोलकांनी सरकारला इशारा दिलाय..पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.

Author: vbn newsnetwork
Post Views: 41