वाळू ने भरलेला ट्रॅक्टर चालविला पोलिसांच्या अंगावर एका पोलिस कर्मचाऱ्याचा पाय झाला फ्रॅक्चर…पोलिसांनी कारवाई करत १४ ट्रॅक्टर सह ८२ लाखांचा मुद्देमाल केला जप्त….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वैनगंगा नदी काठावरील बेलगाव व खमारी येथील वाळू घाटातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिस घटनास्थळी पोहचत वाळूने भरलेला ट्रॅक्टर तपासणी करत असताना एका ट्रॅक्टरने पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर चालविले यात एका पोलिसाचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
या कारवाईत एकूण १४ ट्रॅक्टर, अंदाजे १३ ब्रास वाळू असा सुमारे ८२ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारधा पोलिसांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान वाळू वाहतूक करणारी संशयित वाहने थांबवून तपासणी केली असता, विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच परवाना नसतानाही वाळूची वाहतूक होत असल्याचा प्रकार आढळला. या कारवाईत पोलिसांनी परवानगी नसलेल्या व पर्यावरणाची हानी करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीसहीत वाळू जप्त केली.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें