भंडारा जिल्हातील परिसर हे वनसंपदेने बहेरलेले आहे.परिसरात अनेक बहुपयोगी झाडांच्या प्रजाती बघायला मिळतात. मात्र परिसरात होणारी वृक्षतोड ही सुद्धा चिंतेची बाब आहे. त्यातच तोडलेले वृक्ष बिनधास्त पणे शासकीय जागेत महिनो महिने ठेवले जात असून लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील शासकीय मैदानावर सकाळी गावातील नागरिक, मुले फिरायला जात असतात मात्र काही महिन्यापासून त्या मैदानावर सागवन, चिंच, नीम अस्या अनेक प्रजातीच्या झाडांचे लाकडे मोठ्या प्रमाणात जमा करून ठेवले असल्याने गावकऱ्यांना फिरायला जाता येत नाही. तर याची तक्रार वन विभाग व महसूल विभाग यांना दिली असून त्या ठेकेदार वर कुठलाही पाठपुरावा केला नाही. व कुठलीही कारवाई केली नसल्याने ठेकेदारांचा मनमानी कारभार सुरु असून प्रशासन डोळे बंद करून आहे की काय असा प्रश्न निर्माण आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 30