भंडाऱ्यात पावसाने हजेरी लावली दरम्यान शुक्रवारी परिसरात जाणाऱ्या मार्गावर अक्षरशः तलाव साचले असल्याने नागरिकांना विविध अडचणीच्या सामना करावा लागतो आहे. पावसाने या परिसरात असलेली पाण्याची बोडी तुडुंब भरली असून ओव्हर फ्लो चे पाणी वाहून नेण्यासाठी लावण्यात आलेले काँक्रीटचे पाईप जाम झाल्याने हे पाणी या मार्गावर सखल भागात मोठ्या प्रमाणात साचले असून नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे या परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. याच परिसरात स्थानिक खासदार व आमदार राहत असून याच मार्गावरून प्रवास करतात मात्र अशा पद्धतीचा नगर परिषदेचा दुर्लक्षितपणा व निष्काळजी यामुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त होत असून तात्काळ उपाययजना करण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत….

Author: vbn newsnetwork
Post Views: 32