भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरातील नामांकित श्याम हॉस्पिटल येथील डॉ.देवेश अग्रवाल याने ९ जुलैला एका अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य केले होते.या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने साकोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी लैंगिक छळासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.घटनेच्या दिवसांपासून आरोपी डॉक्टर फरार आहे. बुधवार, १६ जुलैला त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज भंडारा येथील जिल्हा आणि सत्र न्यायालय फेटाळला.आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल याच्या वकिलामार्फत भंडारा जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता.तो जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.आरोपी डॉक्टरने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी कक्षात केलेल्या कृत्याचे साकोलीसह जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटले होते. त्याच्या अटकेसाठी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.मात्र अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने पोलिसाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
