भंडारा जिल्हात सर्वाधिक 1 लाख 81 हजार हेक्टरवर भात पीक लागवड केली जाते. मागील आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने रोवणीच्या हंगामामुळे शेतकऱ्यांना वेळेवर मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे कामे प्रलंबित आहेत.काही शेतकरी वेळेत धान रोवणी व्हावी, यासाठी मिळेल त्या भावात शेतमजूरांना मजुरी देऊन शेतातील काम करून घेत आहेत. तर धान रोवणीसाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने बाहेर गावातून स्वतः च्या किंवा किरायच्या गाडीने मजुरांची आणने व नेऊन देणे करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडले असून सध्या पुरुषांचे मजुरी 500 रुपये तर महिलांचे 450 रुपये मजुरी असून आता शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 38