भंडारा शहरात होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी 735 कोटींचा निधी खर्चून भंडारा शहराबाहेरून राष्ट्रीय महामार्ग 53 नवा बायपास रस्ता तयार करण्यात आलं… मात्र गेल्या तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे सर्वत्र पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळते. तर याच पावसामुळे भंडारा जिल्ह्यातून जाणारा नवीन बायपास रस्त्याची पिचिंग अक्षरशः वाहून गेली. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे पितळ उघडे पडले असून अगदी चार दिवसाआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. या उद्घाटनापूर्वीसुद्धा आलेल्या पावसामुळे एका बाजूचे मुरूम माती व काँक्रीट सह पिचिंग वाहून गेल्याने या बायपासचा निकृष्ट दर्जासमोर आला होता. मात्र तरीसुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचा लोकार्पण पार पडला. आता जेमतेम पावसाळ्याची सुरुवात असताना 735 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या पुलाचे असे हाल पाहायला मिळत आहेत. पुढे किती वर्ष हा बायपास टिकेल ?? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे या पुलाच्या कामाची सखोल चौकशी करून स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे… तर पुलावरून आढावा घेतला आहे….
