भंडाराच्या लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदीवरील पूल तीन फूट पाण्याखाली आलेला आहे. त्यामुळे पवनी – लाखांदूर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पाहायला मिळत आहे. काल दुपारपासून पावसाने उसंत घेतली असून भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीतील पाणी पातळीत घट झाली आहे. गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजातून अजूनही पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील 80 हून अधिक रस्ते जे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते ते सुद्धा खुले करण्यात आले मात्र अशात चुलबंद नदी पुलावर बॅकवटर चा परिणाम पाहायला मिळत असून पूल तीन फूट पाण्याखाली पाहायला मिळत आहे. पाणी या पुलावरून सध्या प्रवाहित होत असून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे…… जिल्हा पत्ती व्यवस्थापन आणि या परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या इशारा दिला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 35