भंडारा जिल्ह्याला पावसाने झोडपलं… गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे खुले करण्यात आले आहे…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

24 तासापासून भंडारा गोंदिया तसेच मध्य प्रदेश राज्यात पावसाची संततदार सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. भंडारा जिल्ह्यातून वाहणारी वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली असून गोसीखुर्द धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे खुले करण्यात आलेले आहे. या धरणातून हजारो लिटर पाण्याचा विसर्ग सुरू असून नदी काठावरील चंद्रपूर, गडचिरोली तसेच भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याला जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें