शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण…….महिला मजुरांकडून पारंपारिक पद्धतीने गीत गात धान पिकाच्या रोवणीला सुरुवात….
भंडारा जिल्ह्यात आठवड्याभरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र पेरणीचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून आता रोवणीलाही सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांची आता रोवणीची लगबग होत आहे. भंडाऱ्याच्या सिरसी परिसरात पारंपरिक पद्धतीने गीत गात महिलावर्ग मोठ्या प्रमाणात रोवणीच्या कामाला लागले आहेत. एकंदरीतच पावसाने गेल्या आठवड्याभरापासून भंडारा जिल्ह्यात संततधार सुरू केली आणि त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून शेतकामांना वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे…

Author: vbn newsnetwork
Post Views: 43