डूरक्या घोणसच्या पोटातून बाहेर पडली एका मागून एक १४ पिल्ले ग्रीनफ्रेंड्सच्या सर्पमित्रांनी केले अनेक सापांना व पिल्लांना निसर्गमुक्त….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथील समर्थनगर येथील लिलाधर झलके यांचे घरी दुर्मिळ बिनविषारी डूरक्या घोणस सापाची सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे व मनीष बावनकुळे यांनी सुरक्षित सुटका केली.बरणीबंद केल्यानंतर निसर्गात मुक्त करायला जात असताना डूरक्या घोणस सापाने बरणीमध्येच एका मागून एक अशी 14 पिल्ले पोटातून बाहेर पडली.ते सर्व पिल्ले सर्पमित्रांनी बरणीमधून लगेच निसर्गात मुक्त केले.

या घटनेबद्दल माहिती देताना प्रा.अशोक गायधने यांनी सांगितले आपल्या भागात बिनविषारी डूरक्या घोणस व विषारी घोणस हे साप पोटातच अंडी उबवून शरीरातून पिल्ले बाहेर प्रसवतात.अशा सापांना विविपेरस किंवा शरीरप्रज्वक म्हणून ओळखले जाते.याशिवाय डूरक्या घोणस सापाला ग्रामीण भागात मुकी मांडवल साप म्हणून ओळखले जाते.याची शेपूट बोथट असल्याने याला दुतोंड्या म्हणतात असा गैरसमज आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें