भंडाऱ्याच्या सिहोरा येथील घटना…… शेतकऱ्यापुढे वैरणाचा प्रश्न….. भरपाईची देण्याची मागणी…
शेतात रचून ठेवलेल्या तणसाच्या ढिगांना आग लागल्याने 15 ट्रॅक्टर वैरण जळून खाक झाल्याची घटना भंडाऱ्याच्या सिहोरा येथे घडली. यात भोलाराम तुरकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आगीचा भडका इतका मोठा होता की, तणसासोबतच शेजारी ठेवलेले शेती उपयोगी साहित्यही पूर्णतः जळून खाक झाले. या घटनेमुळे भोलाराम तुरकर यांच्यावर बैल व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, हंगामी शेतीच्या तयारीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शेतकऱ्याने महसूल विभागाकडे पंचनामा करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 7