प्रहार अपंग क्रांती आंदोलन समिती चे कार्यकर्ते संजय गांधी, श्रावणबाळ व वृद्धपकाळ योजनेचे मानधन अनियमित येत असून या विषयातील व्यक्तींना योजनेचा लाभ मिळत असल्याने मागील सहा ते दहा महिने पासून मानधन रखडलेले आहेत. त्या करिता प्रहार कार्यकर्ते लाखनी तहसीलदार यांना निवेदन देण्याकरिता आले असता तहसीलदार गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. तरीपण कार्यकर्त्यांनी अर्धा एक तास वाट बघूनही तहसीलदार आले नसल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कॅबिन मध्ये जाऊन खाली खुर्चीवर हार चढवून निषेध व्यक्त केला. नंतर याची माहिती तहसीलदार धनंजय देशमुख यांना मिळताच ते लाखनी तहसील मध्ये येऊन निवेदन स्वीकारण्यात आले.

Author: vbn newsnetwork
Post Views: 10