भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) भंडाराच्या वतीने पवित्र पोर्टल शिक्षण सेवक पदभरती समुपदेशन कार्यशाळा जिल्हा परिषद सभागृह,भंडारा येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आली. या समुपदेशन कार्यशाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी एकूण ८४ शिक्षणसेवक व आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या दोन शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी एकूण ८४ शिक्षणसेवक व आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या दोन शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली.यात भंडारा १२, मोहाडी १२, तुमसर २०, लाखनी १०, साकोली १२, पवनी ११, लाखांदूर ९ याप्रमाणे पंचायत समितीनिहाय शिक्षणसेवक उपलब्ध झाले आहेत.जिल्हा परिषद हायस्कूलसाठी इयत्ता पाचवीसाठी २, इयत्ता सहावी ते आठवीसाठी १० अशा एकूण १२ शिक्षण सेवकांना पदस्थापना देण्यात आली.
