सात ते आठ लाखांचा मुद्देमाल चोरीला….. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह…..
भंडाराच्या तुमसर येथे किराणाओलीत मध्यरात्री दरम्यान जवळपास सहा किराणा दुकानाचे शटर तोडून चोरी झाल्याची घटना घडली. जवळपास सात ते आठ लाखांचा मुद्देमाल या दुकानातून चोरीला गेल्याची माहिती असून सकाळी दुकानदारांना हा प्रकार लक्षात येताच तुमसर पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी गाठत अज्ञात चोरट्यांविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा नोंद व पुढील तपास सुरू आहे. मात्र अशा चोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. अशातही घटना घडल्यानंतर आरोपी पकडले जात नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 17