भंडाऱ्याच्या पवनी येथे व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीला घाबरून तरुणीची आत्महत्या…….घराजवळच्या तरुणाने दिली होती व्हिडिओ व्हायरल करत लग्न तोडण्याची धमकी…..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडाऱ्याच्या पवनी येथील रहिवासी साक्षी प्रमोद तलमले (वय वर्ष 24) हिने व्हिडिओ व्हायरल होण्याच्या धमकीला घाबरून विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. घटना अशी की साक्षी तलमले ही पवनी येथील रहिवासी असून तिचा विवाह एका मुलाशी जुळला होता. मात्र तिचा काही वर्षाआधी बॉयफ्रेंड असलेल्या घराजवळच्या राजेश मोहटे याने तू कशी लग्न करते मी बघतो म्हणत बघायला आलेल्या मुलाशी संपर्क करत तिचा लग्न तोडला होता. त्यानंतर सदर मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी समजावल्यानंतर मुलाने यानंतर असा प्रकार होणार नसल्याची शाश्वती दिली. मात्र पुन्हा तिचा लग्न एका मुलाशी जुळला असताना घराजवळच्या राजेश मोहटे याने पुन्हा मुलीशी संपर्क साधत तू कशी लग्न करते मी बघतो म्हणत व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यावरून घाबरून तरुणीने विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केली. तरुणीच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजेश मोहटे विरुद्ध भंडारा पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली असून दोषी युवकावर कठोर कारवाई करून न्याय देण्याची मागणी घरच्यांनी केली आहे याप्रकरणी पुढील तपास व कारवाई भंडारा पोलीस करत आहेत.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें