खमारीत दहशत पसरविणारा नर बिबट्या २४ तासांत जेरबंद…२० दिवसांत सहा हल्ले,१४ जनावरांची शिकार..
भंडारा तालुक्यातील खमारी परिसरात २० दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या व सहा ठिकाणी हल्ले करून पाळीव जनावरांची शिकार करणाऱ्या नर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.अगदी अलीकडे खमारी येथील ईश्वर गोपीचंद समरीत यांच्या वैनगंगा नदी काठावरील शेतशिवारातील गोठ्यात प्रवेश करून ९ शेळ्या फस्त केल्या होत्या.यात सुमारे १ लाख ८० हजारांचे नुकसान झाले होते.या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण होते वनविभागाने नागरिकांचा असंतोष लक्षात घेत मध्यरात्री पिंजरा लावून वनकर्मचाऱ्यांचे पथक तैनातीला ठेवले.पहाटेच्या सुमारास वैनगंगा नदी किनाऱ्यावर लावलेल्या सापळ्यात बिबट्या अडकला. त्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Author: vbn newsnetwork
Post Views: 5