नाकाबंदी दरम्यान जनावरांची तस्करी करणारे वाहन पकडले…17 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कारधा पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने नाकाबंदी करून अवैध जनावरे वाहतूक करणारे वाहन पकडले.पोलिसांनी सदर वाहनामधील १४ जनावरांची सुटका केली.स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून कारधा पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी नाकाबंदी केली असता वाहन पकडले.वाहनाची झडती घेतली असता १४ जनावरे वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी जनावरांची सुटका करून जवळपास १७ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी तीन जनावर तस्करांना ताब्यात घेऊन त्यांचे विरूध्द कारधा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें