जिल्ह्यातील अनेक गावात BSNL कंपनीची रेंज नसून बर्याच गावात टॉवर नाहीत. BSNL कंपनी कडे नागरिकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अन्य कंपनीकडे वळला आहे. नागरिकांना रेंज अणि टॉवर संदर्भात निर्माण झालेली समस्या जेवढया लवकर मार्गी लावता येईल तेवढ्या लवकर मार्गी लावा असे निर्देश केले. बर्याच गावात टॉवर 10 वर्षापासून उभारले असून त्या गावात BSNL चा अधिकारी साधे फिरकुण पण पाहत नाही ही शोकांतिका आहे. इंटरनेट सेवा बरोबर नाही. नागरिकांची आरडा-ओरडा मोठया प्रमाणावर सुरू आहे. भंडारा BSNL विभागाच्या क्वार्टरची पाहणी केली. बरेच क्वार्टर धूळ खात आहेत, काही क्वार्टर मध्ये कोणी राहत नसल्याचेही दिसून आले.
अधिकार्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. क्वार्टरची स्वच्छता ठेवायला सांगितले. भंडारा अणि गोंदिया जिल्ह्य़ात टॉवर उभारा BSNL ला वाढवा असेही यावेळी निर्देश दिले. दोन्ही जिल्ह्यातील गावांची जी यादी दिली रेंज आणि टॉवर संदर्भात ते तातळीने दखल घेण्यास सांगितले.यावेळी आढावा बैठकीला श्री. प्रांजलजी ठाकूर BSNL विभाग चंद्रपूर, श्री.पृथ्वीराजजी बन्सोड, श्री.दिलीपजी चित्रिव तसेच BSNL विभागाचे भंडारा, आणि गोंदिया दोन्ही जिल्ह्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.









