२२ लाखांचा सुगंधीत तंबाखू व गुटखा जप्त…. कारधा पोलिसांची कारवाई… दोघांवर गुन्हा दाखल…..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोपनीय माहितीच्या आधारे
केलेल्या कारवाईत कारधा पोलिसांनी २२ लाख २२ हजार २१२ रुपयांचा सुगंधीत तंबाखू व गुटखा जप्त केला. ही कारवाई कारधा चौकात करण्यात आली. सुगंधीत तंबाखू व गुटखा पान मसाल्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. आयसर ट्रकमधून छत्तीसगढ राज्यातून ही वाहतूक होत असल्याचे कळले. पोलिसांनी तात्काळ कारधा चौक येथे सापळा रचला. यात सीजी ०८ एआर ६०५० चा ट्रक अडवून तपासणी केली. यात २२ लाख २२ हजार सुगंधीत तंबाखू व गुटखा, लोखंडी चॅनल व ट्रक किंमत १५ लाख रुपये असा एकूण ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें