आट्यापाट्या स्पर्धेत भंडारा ची लेक प्राची चटप हिने आशियाई स्पर्धेत पटकविले सुवर्णपद….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्यातील खमारी बुट्टी येथील रहिवासी कु. प्राची दुर्गा केशव चटप या तरुण खेळाडूने भारतीय आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडिया च्यावतीने भारतीय महिला आट्यापाट्या या संघाची कर्णधार च्या नेतृत्वाखाली टिम च्या परिश्रमामुळे आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत विश्वचषकावर भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. तिच्या या यशाने संपूर्ण देशाला अभिमान आहे. परंतु तिच्या या यशामागे अथक परिश्रम, जिद्दीचा आणि अनेक अडथळ्यांवर मात करण्याच्या धैर्याचा मोठा वाटा आहे. प्राची चटप चा हा प्रवास केवळ तिच्या वैयक्तिक यशापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण समाजासाठी आणि विशेषतः मुलींसाठी एक प्रेरणादायी संदेश आहे.

ग्रामीण भागातील मुलींना खेळात यश मिळविण्यासाठी केवळ शारीरिक मेहनतच नाही तर मानसिक आणि सामाजिक अडथळ्यांचाही सामना करावा लागतो. प्राची चटप चे वडील ती लहान असताना मरण पावले. व आई ने घर काम करून मुलीला शिकविले अश्या परिस्थिती कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांनाही साकार करता येते. भंडारा जिल्ह्यातील खमारी बुट्टी या ग्रामीण भागातून येऊन तिने जिल्हा, महाराष्ट्र संघाची कर्णधार राहुन अनेक पदके पटकावली आहेत. भुतान येथे ८ व्या दक्षिण आशियाई महिला आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय टीमची कर्णधार होती. तिच्या व टिमच्या कुशल नेतृत्वाने भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर समाजातील प्रत्येक क्षेत्रात मुलींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.म्हणून तिच्या या यश्या ने भंडारा जिल्हायचे नाव रोशन झाले आहे. म्हणून आज भंडाऱ्याची लेक विश्वात एक! असा हॅश टॅग नागरिकांच्या मोबाईल वर पाहायला मिळत आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें