मारेकरींवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा कामबंद आंदोलन मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद…..
लाखनी ग्रामीण रुग्णालयातील महिला कक्षात मुलीवर उपचार सुरु असल्याने नातेवाइकांना भेटण्यासाठी रुग्नालयाच्या कर्मचाऱ्याने आत मध्ये मुलीवर उपचार सुरू आहे थोडा वेळ थांबा असे म्हटले असता भेटण्यासाठी आलेल्या २ जणांनी कर्तव्यावर असलेल्या शंकर लांजेवार या कक्ष सेवकाला अश्लील शिवीगाळ करत डोक्यावर व डाव्या भुजेवर प्लास्टिक खुर्चीने मारहाण केली व बाहेर निघ तुला पाहून घेतो अशी धमकी दिल्याची घटना रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी लाखनी पोलिसांनी विपुल मेश्राम व विशाल मेश्राम या दोघांवर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर मारेकरींवर कठोर कारवाही करा अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 3