भंडारा जिल्ह्यात जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनात जिल्ह्यातील बचत गटांनी तयार केलेले विविध गृह उपयोगी साहित्य विक्रीकरिता आणण्यात आलेले आहे. महीला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक फायदा कसा पोहोचवता येईल या दृष्टीने देखील आत्मा, कृषी विभाग काम करत आहेत.
तसेच कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याचा फायदा कसा पोहोचवता येईल या हेतूने देखील वेगवेगळे स्टॉल लावण्यात आलेले आहे. तर शेतकऱ्यांना नवनवीन बी – बियाणे यांची माहिती व्हावी त्याकरिता देखील बी बियाणे विक्रीकरिता ठेवण्यात आलेले आहे. शेती उपयोगी अवजारे ट्रॅक्टर असे अनेक विविध साहित्य विक्रीकरिता आणण्यात आलेल्या तीन दिवसीय या कृषी महोत्सवात लाखो लोकांनी भेट दिली आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 3