भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट; मोठी जीवितहानी? अनेक गावांना हादरे..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर येथील आयुध निर्माण कंपनीतील सी सेक्सन मध्ये स्पोट…. 5 लोक मृत झाल्याची प्राथमिक माहिती…. मृत्काचा आकडा वाढण्याची शक्यता…. या कंपनीत दारू गोळा तयार केला जातो…

 जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत स्फोट झाला. त्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शुक्रवारी सकाळी११ वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरला. दूरपर्यंत स्फोटाचे हादरे बसले. आयुध निर्माण कारखान्यातील या स्फोटाने नागरीक भेदरून गेले. या स्फोटाचे कारण काय आहे हे समोर आलेले नाही.

भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे.तर या ठिकाणी जवळपास 20 ते 25 लोक काम करत असल्याची ही माहिती समोर आली आहे. यात पाच लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.तर पाच ते सात लोक जखमी असल्याची माहिती आहे. कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा स्पोट झालेला आहे.या स्फोटाचा आवाज जवळपास पाच किलोमीटर पर्यंत नागरिकांना ऐकू आला आहे. त्यामुळे या स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल ते यावरून कल्पना करू शकतो. या कंपनीत दारू गोळा निर्मिती होते.ज्या ठिकाणी आज स्पोट झालेला आहे ती इमारत संपूर्णतः जमीन दोस्त झालेली असून जेसीबी च्या साह्याने इमारतीचा मलमा बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.तर दुसरीकडे याच कंपनीच्या मागच्या बाजूला कंपनीत स्फोटानंतर टीनाचा तुकडा बाहेर पडलेला होता. त्याच जागून आढावा घेतलेला आहे.कंपनीच्या सी ब्लॉक मध्ये हा स्पोर्ट झाल्याच माहिती मिळत आहे. त्यापैकी आठ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचा समोर आलेला आहे. तर सात ते आठ लोक जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना नागपूर भंडारा येथील रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.घटनास्थळी पोलीस आणि आरोग्य विभागाचा फौज फाटा तैनात झालेला असून कंपनीमधून डेड बॉडी आणि जखमींना बाहेर काढण्याचा कार्य सुरू आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें