नव वर्षाच्या पहिल्या चतुर्थी निमित्त गोंदिया शहरातील प्रसिद्ध गणेश मंदिरात 108 आरत्यानी केली श्री गणेशाची महाआरती…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया शहराच्या इंगळे चौकातील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात नव वर्षाच्या पहिल्या चतुर्थी निमित्त १०८ आरत्यांनी श्री गणेशाची महाआरती करण्यात आली असून शेकडो लोकांनी या महाआरती मध्ये सहभाग घेतला होता.

या वर्षी पहिल्यांदा गोंदिया शहरातील आधार महिला शक्ती संघटना,सिव लाईन महिला समाज समिती आणि सामूहिक तुळशी विवाह समितीच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते सोबतच श्री गणेश वंदना या निमित्त करण्यात आली तर आयोजकांच्या वतीने महाआरती मध्ये सहभागी झालेल्या भाविकांना करिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें