संत गाडगेबाबा स्वच्छता मिशन अभियान अंतर्गत केसलवाडा /पवार ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक… आणि सन्मानीय
पालकमंत्र्याच्या हस्ते..
लाखनी:– लाखनी वरून १० कि. मी. अंतरावर असणाऱ्या केसलवाडा /पवार संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता स्पर्धा ग्राम केसलवाडा /पवार ह्या गावाला जिल्हा प्रथम क्रमांकाने सन्मानित करून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय सावकारे साहेब यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर भंडारा येथे पोलीस कवायत मैदान ह्या ठिकाणी जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी मा. खा. डॉ. प्रशांत पडोळे भंडारा, मा. कोलते सर जिल्हाधिकारी साहेब, मा. नुरूल हसन पोलीस अधिक्षक भंडारा, मा. गंगाधरजी जिभकाटे अध्यक्ष जि. प. भंडारा, मा. श्री. समीर कुर्तकोटी साहेब सी. ई .ओ, मा. श्री राहुजी गवर्र साहेब उपवनरक्षक, मा. माणिक चव्हाण पाणी व स्वच्छता विभाग, मा. श्री गजापुरे साहेब, मा. श्री सोन्टके साहेब शिक्षणधिकारी, मा. श्री. नंदागवळी साहेब, मा. श्री परब साहेब मा. श्री देशमुख साहेब, ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी, मा. श्री. नेताजी धारगावे खंडविकास अधिकारी पं. स. लाखनी, मा. श्री. लांजेवार, मा. श्री. टेभरे, मा. श्री प्रमोदजी हुमणे व भंडारा जिल्ह्याचे जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष श्री रणवीर उर्फ कैलास भगल, श्री संजय पाटील बिसेन अध्यक्ष वन समिती यांच्या उपस्थतीत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
केसलवाडा /पवार या ग्रामपंचायतीला गावातील १००टक्के लोकांच्या सहभागाने व लोकसहभागातून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत असणाऱ्या स्पर्धेत भाग घेऊन गावामध्ये तीन हजार वूक्ष लगावट, गटरे, रस्ते, वनराई बंधारे तसेच विविध उपक्रम व स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता सन्मानित असणारे सरपंच सौ.रोमिलाताई रामेस्वरजी बिसेन, उपसपंच अनिलजी नंदेस्वर सचिव कु. मिनालीताई लांडगे, श्री रामेस्वरजी बिसेन, ग्रा. पं. सदस्य, अमितजी खेडीकर, वंदनाताई नंदेस्वर, अंजीरताई नान्हे,छन्नुताई रहांगडाले, अर्चना वलाडे, यांनी गावाच्या सर्वांनी विकासासाठी खूप प्रयत्न केल्यामुळे आज जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावून पालकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यानंतर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित सन्मानित सरपंच, उपसपंच, सचिव, सदस्यांच्या स्वागतासाठी गावाच्या दर्शनीय गेस्वर गावातील मान्यवर पुरुष व महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत केले जिल्हा परिषद व प्राथमिक शाळाचे शिक्षक व मुले तसेच तिरुपती विद्यालयातील शिक्षक व मुलांनि ढोल तासारे तेझीम द्वारे गावाच्या दर्शनीय गेटवरून मोठ्या हर्ष उल्लासाने ग्रामपंचायत इथे घेऊन गेले. त्या ठीकाणी ग्रामपंचायत सभागुहांमध्ये २ वाजेच्या ग्रामसभेचे आयोजन केले होते त्यामधील गावातील ८० टक्के लोकांच्या स्वाक्षरीने ग्रामसभेची सुरुवात झाली त्यामध्ये गावातील मान्यवर मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच गावातील सरपंच रोमिलाताई बिसेन व श्री रामेस्वरजी बिसेन, ग्रा. पं. सदस्य, यांनी गावचे लोकांचे आभार मानले व गावातील गावाजेवनाचा सर्वांनी स्वाद घेतला. अशा पद्धतीने गावात आनंदीत सोहळा साजरा करण्यात आला त्यावेळी गावामधील पोलीस पाटील सौ. अर्चनाताई वंजारी, आदर्श पट समितीचे अध्यक्ष नागोजी पुराम, वनसमितीचे अध्यक्ष सोमाजी टेभारे, शिवदयालाजी बोपचे, संजय बिसेन, शुक्राचार्य बघेले, ग्रा. पं.चे कर्मचारी लीलाधर राहंगडाले. वनिता कावळे, मीनाक्षी राहंगडाले, राजी उके, सेवा सहकारी संस्थाचे अध्यक्ष रंजी देनेश येवेकर, झनकजी राहंगडाले, वसंतजी राहंगडाले, माजी उपसपंच ज्ञानेश्वर बोपचे,राजेशजी वंजारी, विजेंद्र हर्षे , रानु वाहिले, बबिता वाहिले, राजेशजी पटले, राजेंद्र पटले, सितदुरा नान्हे असे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
