जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक नजरअंदाज अहवाल जाहीर….
अतिवृष्टी व पुरामुळे भंडारा जिल्हाभरातील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. यात सातही तालुक्यातील तब्बल 4 हजार 936 हेक्टरमधील पीके अशरक्षः खरडली गेली. त्यामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशानाने याबाबतीत शेतपीक नुकसानीचा प्राथमिक नजरअंदाज सुधारित अहवाल जाहीर केला आहे.
भंडारा जिल्ह्यात तीन दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं होतच नव्हतं केलं. शेतकऱ्यांनी उसना उधार घेऊन कशी बशी शेती पेरली पण अस्मानी संकटात सार काही वाहून गेल. आता शेतकऱ्यांची आशा आहे. ती मायबाप सरकारकडे थोडीफार मदत मिळाली की दुबार पेरणी करता येईल… जिल्ह्याच्या विचार केला तर सर्वसाधारणपणे 1 लाख 87 हेक्टर क्षेत्रावर पिक पेरले जाते त्याच्यापैकी भाताचे पीक 1 लाख 75 हजार हेक्टर शेतावर घेतले जाते आणि इतर पिकाच धरून एकत्रित 1 लाख 23 हजार हेक्टर वर पेरणी या ठिकाणी झालेली आहे. परंतु या ठिकाणी आता जो आठ आणि नऊ तारखेला जी अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये दोन दिवसांमध्ये जवळपास 240 मिलीमीटर पाऊस पडला आहे. वैनगंगा आणि चुलबंद नदीला पूर आलेला होता. त्याच्यामुळे नदी, नाल्याकांवरील क्षेत्र पाण्याखाली आलं होत. तीन दिवसा पर्यंत शेतात पाणी होतं. त्यामुळे साधारणता सातही तालुक्याचा विचार केला तर 4936 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक पंचनामा करण्यात आला आहे.
