अल्पवयीन पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला.पीडितेच्या वडिलांना हे कळल्यावर त्यांनी विचारणा केली असता,आरोपीने मुलीची बदनामी करण्याची धमकी दिली.याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सिहोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे.मंगेश प्रभुदास रहांगडाले (२५), असे आरोपीचे नाव आहे.परिसरातील एका वास्तव्यास असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन पीडितेच्या घरी जाऊन २३ ऑक्टोबर २०२४ रोजी मंगेशने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.यानंतर असा प्रकार वारंवार होत राहिला.यादरम्यान,आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिषही दाखविले. ही माहिती कुणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकीही पीडितेला आरोपीने दिली होती.हा प्रकार पीडितेच्या वडिलांना कळाल्यावर त्यांनी विचारणा केली असता,त्यांनाच उलट बोलून मुलीची बदनामी करण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिहोरा पोलिसांत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
