भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोंदेखारी येथे हार्वेस्टर वाहून नेणारा ट्रॅक्टर उलटल्याने घरालगतच्या गोठ्या समोर बांधलेल्या दोन म्हशी जखमी झाल्या. यात जिवीतहाणी टळली असली तरी काशिराम शरणागत नामक पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.तुमसर तालुक्यातील गोंदेखारी परिसरात उन्हाळी धान कापणीसह मळणीचा हंगाम धडाक्यात सुरू आहे.मौदा तालुक्यातील हार्वेस्टर मालक या परिसरात दाखल झाले आहेत.दरम्यान चुल्हाडकडून गोंदेखारी येथे हार्वेस्टर वाहून नेत असलेली ट्रॅक्टरक्र. एम. एच. ४०/एल. ७५५६ या ट्रॅक्टरला जोडलेली ट्रॉली काशिराम शरणागत या शेतकरी पशुपालकाच्या गोठ्यासमोर उलटली. यात जिवीतहाणी टळली असली तरी सदर पशुपालकाच्या गोठ्यासमोर बांधलेल्या दोन म्हशी जखमी झाल्या. ट्रॅक्टर ट्रॉलीचे मागील चाक निघाल्याने ट्रॉली उलटल्याचे सांगितले जात आहे. सदर ट्रॅक्टर मौदा तालुक्यातील चिखली येथील खुशाल वैद्य यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले जात आहे.
