नुकशान भरपाई देण्याची केली मागणी
गोंदिया तालुक्याच्या कामठा गावातील क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या सोलर हायमास्ट लाईटचा खांब कोसळल्याने मैदानात खेळत असलेला एक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना कामठा गावातील क्रीडा संकुलात उघडकीस आली असून यात १५ वर्षीय आर्यन मेंढे हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कामठा येथील क्रीडा संकुलात काही महिन्यांपूर्वीच सोलर हायमास्ट लाईटचे खांब उभारण्यात आले होते या खांबावर सोलर प्लेट लावून कंत्राटदाराने काम पूर्ण केले मात्र काल दुपारच्या सुमारास क्रीडा संकुलात सराव करण्यासाठी खेळाडू व विद्यार्थी नेहमीप्रमाणे आले असता जीईएस हायस्कूल येथे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी आर्यन मेंढे हा खांबापासून काही अंतरावर सराव करीत असताना अचानक सोलर प्लेट लागलेला खांब खाली कोसळला.यात खांब आर्यन च्या डोक्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जखमी झाला या घटनेने क्रीडा संकुलात एकच धावपळ उडाली होती. दरम्यान उपस्थितांनी आर्यन मेंढे या तरुणाला लगेच रुग्णालयात हलविले. या घटनेची माहिती क्रीडा संकुल प्रशासनाला देण्यात आली. असून या प्रकरणाची चौकशी करून दोषीं कंत्राटदारावर कारवाई करावी,तसेच उपचाराचा संपूर्ण खर्च विद्यार्थ्याच्या पालकांना देण्यात यावा,अशी मागणी महेंद्र मेंढे यांच्या सह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
