स्वाक्षरी न-करता वृद्ध व्यक्तीच्या खात्यातून एका ५० वर्षीय व्यक्तीने केले ९६५००रुपये लंपास!…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पैसे लंपास करणाऱ्या व्यक्तीशी बँक कर्मचाऱ्याची केली साठ-गाठ…

साकोली तालुक्यातील को-ऑपरेटिव बँक सानगडी ह्या बँकेतून विड्रॉल फॉर्मवर कुठलीही स्वाक्षरी न-करता एका ५० वर्षीय व्यक्तीकडून एका वृद्ध व्यक्तीच्या खात्यातून बेकायदेशीरपणे ९६ हजार ५००रुपये लंपास केली असल्याचा आरोप वृद्ध खातेदाराने केला आहे.
पीडित वृद्ध व्यक्तीचे खाते हे साकोली येथील को-ऑपरेटिव्ह बँकेत असून,वृद्ध व्यक्तीच्या गावातीलच ओळख असलेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीने कुठलीही स्वाक्षरी-करता बँक खात्यातून ९६५०० रुपयाची उचल केली असल्याचं खातेधारकाकडून सांगण्यात येतंय.विशेष म्हणजे या सर्व प्रकारात एका बँक कर्मचाऱ्याचे हात असून,हा प्रकार सानगडी शाखेच्या को-ऑपरेटिव बँकेत घडलेला असून,दोघांच्याही संगणमताने ही रक्कम उचलण्यात आलेली असल्याचे पीडित वृद्ध व्यक्तीचे म्हणणे आहे.

सध्या बँक कर्मचाऱ्याला बँकेकडून काढण्यात आलं असलं तरी,कर्मचारी हे जर एखाद्याशी संगमत करून अशाप्रकारे एखाद्याच्या बँक खात्यातून अशाप्रकारे पैसे गहाळ करत असतील,तर एका सामान्य माणसानं बँकेत पैसे ठेवावे तरी असा प्रश्न पीडित खातेधारकानं केला असून,या संदर्भात संबंधितांची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी खातेधारकानं केली आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें