सोलर पपं नऊ महिन्यापासून बंद….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बोरगाव येथील शेतकरी अडचणीत…पाण्याअभावी जमिनीला पडल्या भेगा…नगदी पिके वाळण्याचा स्थितीमध्ये….

भंडारा जिल्ह्याच्या बोरगावं बुज.येथील अल्पभूधारक शेतकरी चतुराम बावनकुळे यांनी शेती सिंचनासाठी प्रधानमंत्री कुसुम योजनेतून सोलर पंप लावले.मात्र सोलर पॅनलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील नऊ महिन्यापासून सोलर बंद आहे.कंपनीला वारंवार निवेदन देऊन देखील कोणतीही दखल घेतली नाही.त्यामुळे पाण्याअभावी पिकांचे नुकसान होत आहे.शेती ही पाण्याशिवाय होऊ शकत नाही.आधुनिक पद्धतीने शेतपिके घेण्यासाठी सबसीडीवर कुसुम सोलर योजना सुरू केली.चतुराम व त्यांची पत्नी निर्मल बावनकुळे यांनी ४ वर्षांपूर्वी शेतावर जे.के. कंपनीचे पाच वर्ष वॉरंटी असलेले सोलर पंप लावले.पाण्याच्या भरोशावर विविध पिकाची लागवड केली.आता शेतात नगदी भाजीपाला लावलेला असून आता पाण्याअभावी जमिनीला भेगा पडून वाळण्याच्या स्थिती मध्ये आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें