भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील सोनमाळा येथे शेतशिवारात लावलेल्या विद्युत खांबावरील ट्रान्सफार्मरला शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागल्याची घटना घडली.सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र शेतकऱ्यांसमोर सिंचनाची समस्या निर्माण झाली आहे.सोनमाळा हा परिसर जंगलव्यात आहे परिसरात नागरिकांची उपजीविका विशेषतः शेतीवर अवलंबून आहे.शेतकरी खरिपा नंतर रब्बी हंगामातील उन्हाळी धानपिकाची लागवड करतात मात्र अचानक आग लागल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची समस्या निर्माण झाली आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 2