सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत २६ जून हा दिवस राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिन’ सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने यावर्षी भंडारा जिल्हयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये २६ जून २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचारी समवेत प्रभात फेरी, सामाजिक समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, भंडारा कार्यालय परिसरापासून प्रारंभ करण्यात येणार असून, जिल्हा परिषद चौक मार्गे त्रिमुर्ती चौक मार्गे सामाजिक न्याय भवन, येथे दिंडीचा समारोप करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम मान्यवरांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद चौक, भंडारा येथील सभागृहात सकाळी 11.30 वाजता संपन्न होणार आहे. तरी नागरिकांनी कार्यक्रमास. उपस्थित राहावे असे आवाहन, श्रीमती आशा कवाडे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांनी केले आहे
