भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील लघु पाटबंधारे जिल्हा परिषद चा तलावाची पार फुटल्याने परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर साकोली व गडकुंभली गावातील अंदाजे 300 हेक्टर क्षेत्रातून पाणी वाहत असल्याने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे तर सध्या स्थितीमध्ये दोन घरात पाणी शिकले आहे यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.जिल्हा परिषद विभागातील लघुपाटबंधारे येथील साकोली येथील तलाववाला भगदाड पडले होते या भगदाड मधून वारंवार पाणी वाहत असल्याने हे भगदाड मोठे झाले त्यामुळे काल आलेल्या पावसामुळे साकोली येथील तलावात पाणी ओरफ्लो झाल्याने तलावाची पार फुटली असा अंदाज व्यक्त केला जात असून याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिली होती मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून अशी दुर्घटना घडलेली आहे हे मात्र विशेष..
