साकोली भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून वृद्ध शेतकऱ्याची मोठी फसवणूक!
आर्थिक व्यवहार करून शेतजमीन मोजणीमध्ये केला घोळ:पीडित वृद्ध शेतकऱ्याचा आरोप!
भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून न्याय हवा:पीडित वृद्ध शेतकरी मोतीराम हटवार यांची मागणी
डारा जिल्हातील साकोली तालुक्यांतर्गत येत असलेल्या सानगडी तलाठी कार्यालय हद्दीत गट क्रमांक ९९ नुसार मोतीराम हटवार ह्या वृद्ध शेतकऱ्याची मौजा सालई येथे सातबाऱ्यानुसार सामूहिक जमीन आहे.ती सामूहिक असलेली शेतजमिन वेगळी करायची असल्यामुळं त्या शेतजमिनच्या मोजणीसाठी मोतीराम हटवार या पीडित वृद्ध शेतकऱ्याने साकोली भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अर्ज केलेला होता.त्यानुसार साकोलीच्या भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून जमिनीची मोजणीही करण्यात आली.मात्र जमीन मोजणीझाल्यावर ३० दिवसाच्या आत जमिन मोजनीची प्रत देणे अनिवार्य असताना,पीडित शेतकऱ्याने महिनो-महिने वारंवार हेलपाटे मारल्यानंतर भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांकडून सलग एक वर्ष लोटून जमीन मोजणीची प्रत देण्यात आली…!
मात्र शेतजमीन मोजमाप ही सातबाऱ्यानुसार करण्यात आली नसून,त्या शेतजमीन मोजणीच्या प्रतमध्ये भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून मोठी हेराफेरी केली असून,प्रत पूर्णपणे खोटी दिली असल्याचा आरोप पीडित वृद्ध शेतकरी मोतीराम हटवार ह्यांनी केला आहे.तर पीडित वृद्ध शेतकऱ्याने वरिष्ठांकडे न्याय देण्याची मागणी केली असून,जमीन मोजणीत घोळ करणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
