भंडार जिल्ह्यातील पालांदुर ग्रामीण रुग्णालयात मागील अनेक वर्षांपासून इ सी जी मशीन उपलब्ध नव्हते परिणामी रुग्णांना ४५ किमी लांब जिल्हा रुग्णालयात तपासणी साठी जावे लागत होते.ही समस्या लक्षात घेत धीवरखेडा येथील सरपंच गणेश हत्तीमारे यांनी इ सी जी मशीन साठी वारंवार पाठपुरावा केला व प्रशासनाला ही समस्या लक्षात आणून दिली. आता या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयाला ही मशीन मिळाली असून स्थानिक रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 49